आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

घातक हत्यार घेऊन फिरणारा तडीपार जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 18, 2021
Spread the love

युनिट दोनकडून कारवाई : आरोपी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : घातक हत्यार घेऊन फिरणाऱ्या तडीपार आरोपीला जेरबंद करण्यात युनिट दोनला यश मिळाले असून आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

शनिवारी (16 ऑक्टोबर) सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, वैशाली भोसले आणि स्टाफ असे युनिट 2 कार्यक्षेत्रात लष्कर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग फिरत असताना उत्तम तारु व मितेश चोरमोले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, जांभूळवाडी तलावाजवळ कात्रज पुणे येथे एक तडीपार इसम आपल्या हातामध्ये धारदार कोयता घेऊन थांबला आहे.

सदर बातमीची खातरजमा करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांना कळविली असता, त्यांनी कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले. त्या प्रमाणे वरील स्टाफच्या मदतीने बातमीच्या ठिकाणी जाऊन बातमीतील वर्णनाच्या इसमाला जागीच ताब्यात घेऊन सदर इसमास नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव बंटी उर्फ महेश विनायक चव्हाण (वय 22, रा. खोपडेनगर कात्रज पुणे) असे असल्याचे सांगितले. त्याच्या कब्जात 300 रुपये किमतीचा एक लोखंडी कोयता मिळून आला . त्याप्रमाणे सदर इसमास युनिट 2 कार्यालयात आणून त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून त्याची वैद्यकीय तपासणी व कोविड 19 ची तपासणी करून पुढील कारवाईकामी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ही, माननीय पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, वैशाली भोसले, फौजदार यशवंत आंब्रे, पोलीस अंमलदार अस्लम पठाण, मोहसिन शेख, संजय जाधव,उत्तम तारु, मितेश चोरमोले, साधना ताम्हाणे यांनी केलेली आहे.