आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दसऱ्याच्या दिवशी आईचा खून करणारा मद्यपि मुलगा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 18, 2021
Spread the love

सिंहगड रोड पोलिसांनी केली कारवाई : दारूसाठी पैसे न दिल्याने केले कृत्य

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : दारु पिण्याच्या व्यसनापायी मुलाने दसऱ्याच्या दिवशी आईला हातातील कड्याने, सुरी, लाकडी दांडक्याने मारहाण करुन खून केला. सिंहगड रोड पोलिसांनी आईचा खून करणाऱ्या मुलाला अटक केली आहे.

सचिन दत्तोपंत कुलथे (वय ३१, रा. महालक्ष्मी आंगन, अभिनव कॉलेज रोड, नर्हे) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. तर, विमल दत्तोपंत कुलथे (वय ६०) असे खून झालेल्या आईचे नाव आहे. याप्रकरणी अनिता मोहन चिंतामणी (वय ४४, रा. नऱ्हे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, सचिन आणि त्याची आई विमल कुलथे हे दोघे जण रहात होते. सचिन याला दारु पिण्याचे व्यसन आहे. त्याच्या या व्यसनामुळे त्याची पत्नी त्याला एक वर्षापूर्वी सोडून माहेरी निघून गेली आहे. चालक म्हणून काम करणारा सचिन गेल्या काही दिवसांपासून बेरोजगार होता. मौजमजा करण्यासाठी तो आईकडे नेहमी पैशाची मागणी करत असे. दारुसाठी पैसे न दिल्याने शुक्रवारी दसऱ्याच्या दिवशी त्याने आईला सुरीने व लाकडाच्या दांडक्याने मारहाण केल्याने यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने फिर्यादी बहिणीला याची माहिती दिल्याने ही घटना समोर आली. घटनेनंतर तो फरार झाला होता.

आईवर अंत्यसंस्कार केल्यानंतर अनिता चिंतामणी यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी त्याला स्वामी नारायण मंदिराजवळ असणाऱ्या टेकडी परिसरातील जंगलातून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे करीत आहेत.