आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पोलिसांचा ‘खबऱ्या’ समजून चाकूने वार करणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 21, 2021
Spread the love

खडकी पोलिसांची कारवाई : वस्तीमधील लोकांवर चाकू उगारून दहशत पसरविली

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पोलिसांचा खबऱ्या असल्याने समजून तिघांनी एका तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

कझम ऊर्फ कझमफर हुमायुन इराणी (वय ३५, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव असून, त्याचा साथीदार सय्यद नूर जानशा इराणी (वय ५२) आणि रुकसाना सय्यदनूर इराणी (वय ४५) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हैदर शौकत शेख (वय २०, रा. महात्मा गांधी वसाहत, पाटकर प्लॉट, पाटील इस्टेटसमोर) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (गु. र. नं. ३१२/२१) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हे मंगळवारी दुपारी त्यांचे आजीच्या दुकानात जात होते. त्यांच्या वस्तीमध्ये राहणाऱ्या कझम इराणी याने त्याची व त्याच्या नातेवाईकांची खबर पोलिसांना देतात. असे समजून फिर्यादीला पकडले. सय्यद व रुकसाना यांनी हाताने मारहाण केली. कझम याने फिर्यादीच्या गळ्यावर चाकूने वार केला. तसेच वस्तीतील लोकांवर चाकू व कोयता उगारुन दहशत निर्माण केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे तपास करीत आहेत.