आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

3 महिन्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी जन्मदात्रीच जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 25, 2021
Spread the love

येरवड्यातील घटना : अनैतिकसंबंधातून जन्मलेले बाळ ठरले खुनाचे कारण

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या तीन महिन्याच्या मुलीचा आईनेच मुलाच्या मदतीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना येरवड्यात उघडकीस आली आहे. त्यानंतर १४ वर्षीय मुलाने तिला पिशवीत घालून नदीपात्रात फेकून दिले.

याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली असून, अल्पवयीन मुलाला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला मूळची बुलढाणा जिल्ह्यातील असून १६ वर्षापूर्वी तिचे कर्नाटक राज्यातील तरुणासोबत लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा झाला असून, त्याचे वय १४ वर्ष आहे. काही महिन्यापूर्वी तिचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर ती मुलासोबत येरवड्यात आली असता एका तरुणा सोबत महिलेची ओळख झाली. ओळखीतून ते दोघेही एकत्र राहत असताना अनैतिक संबंधातून त्यांना मुलगी झाली.

दरम्यान, समाजामध्ये बदनामी होईल, मुलीचे वडील कोण अशी विचारणा झाल्यावर काय उत्तरे द्यायची अशी चिंता महिलेला होती. त्यामुळे २२ ऑक्टोबरला तिने चिमुरडीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मुलीला पिशवीत घालून तिला नदीपात्रात फेकण्यास मुलाला सांगितले. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.