आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

30 वर्षीय तरुणाचा भल्या पहाटे खून करणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 27, 2021
Spread the love

कोंढव्यातील घटना : कामावरून काढून टाकण्याची देत होता धमकी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मालकाला सांगून कामावरुन काढून टाकेल, अशी धमकी देणार्‍या तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन त्याचा खून केल्याची घटना कोंढव्यात घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

अमोल खडके (वय 30, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कोंढवा पोलिसांनी आरोपी सुरज फाळके याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी सांगितले की, अमोल खडके व सुरज फाळके हे दोघे पाऊच बनविणार्‍या कंपनीत कामाला आहेत. अमोल हा सुरजला नेहमी मालकाला सांगून तुला कामावरुन काढून टाकेन, अशी धमकी देत होता. त्यावरुन आज पहाटे पिसोळी येथील रिलायन्स मार्टच्या मागच्या बाजूला त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात सुरज याने अमोल याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली.

त्यात अमोल याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.