आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सराईत वाहनचोर जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 28, 2021
Spread the love

गुन्हे शाखा युनिट चारची कामगिरी : चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : सराईत वाहनचोरास जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट चारला यश मिळाले आहे. आरोपीकडून चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, त्यास पुढील कारवाईकरिता आळंदी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वाहनचोरी प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक संजय आढारी यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, साप्रस चौकीजवळ एक इसम थांबला असून, त्याच्या कब्जात असलेली मोटारसायकल त्याने चोरलेली आहे. त्या मोटारसायकलला नंबरप्लेट नाही. अशा आशयाची पक्की खबर मिळाल्याने पोलीस उप-निरीक्षक, जयदीप पाटील, पोलीस अंमलदार राजस शेख, संजय आढारी, प्रवीण भालचिम, दत्ता फुलसुंदर, विशाल शिर्के, प्रवीण कराळे यांनी साप्रस चौकी परिसरात थांबलेल्या नंबरप्लेट नसलेल्या मोटार सायकलधारकास ताब्यात घेतले.

सुदर्शन ऊर्फ छऱ्या विजय मोटे (वय २२, रा. आळंदी, ता. खेड, जि. पुणे) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडे गाडीबाबत चौकशी केली असता त्याने काहीएक माहिती दिली नाही. त्यास गुन्हे शाखा, युनिट ०४ कार्यालयात आणून अधिक चौकशी केली असता, त्याने सदरची गाडी आळंदी परिसरातून चोरल्याचे कबूल केले. सदर तीन गाड्या ह्या आळंदी, सांगवी आणि खेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोरीच्या आहेत. आरोपीच्या कब्जातून वरील तीन गुन्ह्यात चोरीस गेलेल्या तीन हिरो स्प्लेंडर प्लस मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. आरोपीस पुढील कारवाईकरीता आळंदी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, पोलीस उपनिरीक्षक, जयदीप पाटील, पोलीस अंमलदार राजस शेख, दीपक भुजबळ, संजय आढारी, प्रवीण भालचिम, दत्ता फुलसुंदर, विशाल शिर्के, प्रवीण कराळे यांनी केली आहे.