राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखी देवी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली यांच्याकडे दिलेल्या चाळीस अर्जांची जनसुनवाई मंगळवारी (२६ ऑक्टोबर) झाली. सदर अर्जांचा समझोता झाल्याने त्यांचे संसार जुळले व अर्जांची निर्गती करण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखी देवी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
पुणे पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर येथील रिक्रिएशन हॉलमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखी देवी आणि पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) डॉ. अभिनव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस उपआयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली यांच्या सदस्य चंद्रमुखी देवी यांचे अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तसेच कार्यक्रमास समुपदेशिका शालिनी तसेच विधी सेवा प्राधिकरण यांचेकडील चार वकील आणि महिला सहाय्यक कक्षाचे समुपदेशक हजर होते.
सदर कार्यक्रमाचे वेळी झालेल्या जनसुनवाई मध्ये एकूण ४० अर्ज ठेवण्यात आले असून नमुद अर्जातील अर्जदार, गैरअर्जदार, अर्जांचे चौकशी अधिकारी व अंमलदार प्रत्यक्ष हजर होते. सदर जनसुनवाई कामी ठेवण्यात आलेल्या ४० अर्जांपैकी चंद्रमुखी देवी (सदस्य राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली) यांच्या समक्ष अर्जांचा समझोता झाल्याने त्यांचे संसार जुळले व अर्जांची निर्गती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाकडून त्यांचेकडे प्रलंबित असलेल्या एकूण २८६ अर्जाबाबत माहिती विचारण्यात आली होती. भरोसा सेलकडून नमुद अर्जासंबधी परिमंडळ सहायक पोलीस आयुक्त कार्यालय व पोलीस स्टेशनकडून सदर अर्जाची केलेली कारवाई समझोता, अर्जबंद, अर्जमागे घेतला याबाबत सविस्तर माहिती प्राप्त करुन सदर माहिती राष्ट्रीय महिला आयोगाकडून सादर करण्यात आलेली आहे.
पुणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत असलेल्या भरोसा सेलमध्ये महिला सहायक कक्ष, जेष्ठ नागरिक कक्ष, बाल सहाय्य कक्ष या अंतर्गत पीडितांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध आहेत. कोर्टात अथवा पोलीस स्टेशन येथे तक्रार करुन संसार मोडण्यापेक्षा भरोसा सेलमध्ये संमुपदेशनाव्दारे संसार जुळविण्यात येतात, तसेच ज्येष्ठ नागरिक व बालकासंदर्भात तक्रारीची योग्य तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करण्यात येते.
पोलीस आयुक्त (पुणे शहर) अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम घेण्यात आला असून, सदर कार्यक्रमास मा. पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे, अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, राजेंद्र कदम, सहपोलीस निरी. सुजाता शानमे, योगिता बोडखे आणि भरोसा सेलचे सर्व अंमलदार उपस्थित होते.
