आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वाँटेड किरण गोसावी अखेर जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 28, 2021
Spread the love

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकची कामगिरी : वाशी-मुंबईतून शिताफीने अटक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : वाँटेड किरण गोसावी याला जेरबंद करण्यात पुणे शहराच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकला यश मिळाले असून, त्यास वाशी-मुंबईतून शिताफीने अटक करण्यात आले.

पुण्याचे पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त ( गुन्हे) यांनी गुन्हे शाखेकडील सर्व पथकांना फरासखाना पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी किरण गोसावी याचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार खंडणी विरोधी पथक- १, गुन्हे शाखा पुणे शहर पथकातील पोलीस अंमलदार यांना त्यांच्या बातमीदारामार्फत फरासखाना पोलीसमधील दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी किरण गोसावी याच्या ठिकाणाविषयी खात्रीशीर बातमी प्राप्त झालेली होती.

त्याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे खंडणी विरोधी पथक एककडील अधिकारी व अंमलदार यांनी नमुद आरोपी किरण गोसावी (वय ३७, रा. वाशी, नवी मुंबई) यास ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे २) लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली, खंडणी विरोधी पथकाचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस अंमलदार, संजय भापकर, चव्हाण यांनी केली आहे.