आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सराईत वाहनचोर जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 29, 2021

मार्केटयार्ड पोलिसांची कामगिरी : चोरीच्या सहा टूव्हीलर हस्तगत

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सराईत वाहनचोरास जेरबंद करण्यात मार्केटयार्ड पोलिसांना यश मिळाले असून, याप्रकरणी चोरीच्या सहा टूव्हीलर हस्तगत करण्यात आल्या आहेत.

मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासपथकाचे पोलीस उपनिरीक्षक कदम, पोलीस हवालदार हिरवाळे, पोलीस नाईक किरण जाधव, पोलीस शिपाई अनिस शेख, कदम असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे यांच्या आदेशाने वाहनचोरांचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस शिपाई स्वप्नील कदम व अनिस शेख यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून बातमीच्या ठिकाणी सापळा रचून आरोपी अभिषेक दशरथ वाघमारे (वय १९, रा. दांडेकर पूल, पुणे) यास ताब्यात घेऊन त्याचेकडे चोरीचे वाहन मिळून आल्याने त्यास दाखल गुन्ह्यात अटक केले आहे.

त्याचेकडे तपासादरम्यान आणखी पाच टुव्हीलर गाड्या मिळून आल्याने एकूण गुन्ह्यात सहा टूव्हीलर गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. पुढील तपास पोलीस नाईक किरण जाधव करीत आहेत.

सदरची कारवाई ही, अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ ५ च्या पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील, वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त गलांडे यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. व्ही. देशपांडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सविता ढमढेरे यांच्या सूचनांप्रमाणे तपासपथकाचे पोलीस उपनिरीक्षक कदम, पोलीस हवालदार हिरवाळे, पोलीस नाईक किरण जाधव, पोलीस शिपाई अनस शेख, मुसळे, पाटील, पोळेकर, कदम, घुले यांच्या पथकाने केली आहे.

get_footer();