आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पीएसआय महिलेवर अत्याचार करत ठार मारण्याचा प्रयत्न

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 30, 2021
Spread the love

खडकी पोलीस स्टेशनमध्ये एपीआयवर गुन्हा : सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून झाडली गोळी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने पोलीस उपनिरीक्षक महिलेसोबत अनैसर्गिक संबंध ठेवत सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. खडकी पोलिस ठाण्यात या प्रकरणी संबंधित एपीआय वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातच काम करणाऱ्या 33 वर्षीय पीएसआय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

हरीश सुभाष ठाकूर (वय 40) असे गुन्हा दाखल झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. त्यांच्याविरोधात भा द वि 307, 494, 498, 377, 506 सह पॉक्सो कलम 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार 2013 पासून वारंवार घडला.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी हरीश सुभाष ठाकूर हे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पुणे पोलिस दलात काम करतात. 2013 मध्ये त्यांनी फिर्यादी महिलेला आपल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्याचे खोटे सांगितले आणि त्यांच्यासोबत विवाह केला. त्यानंतर त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करत वेळोवेळी त्यांच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. त्यांच्या पाच वर्षीय मुलासमोरदेखील त्याने अनैसर्गिक संबंध ठेवल्याची फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान 2015 मध्ये आरोपीने नवी मुंबई येथील राहते घरात फिर्यादीवर सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. यामध्ये फिर्यादीच्या बोटाला जखम झाली. आरोपीच्या दबावामुळे फिर्यादीने इतके दिवस पोलिसात तक्रार दिली नाही. परंतु लग्नाची नोंदणी करण्यास आरोपीने टाळाटाळ केल्यानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.