आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बारामती-पाटस मार्गावर दारुने भरलेला ट्रक पलटी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 30, 2021
Spread the love

नागरिकांकडून चालकाला मारहाण : दारूचे बॉक्स पळविण्यात महिलांचा सहभाग

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : बारामती-पाटस महामार्गावर उंडवडी कडेपठार येथे दारुच्या बॉक्सने भरलेला ट्रक पलटी झाला आहे. ट्रक ड्राईव्हरचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास पलटी झाला. पलटी झालेल्या ट्रकमध्ये 65 लाख रुपये किमतीचे 950 बॉक्स भरले होते. या झालेल्या अपघातामध्ये कोणतेही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, तेथील स्थानिकांनी दारुचे बॉक्स पळवले, अशी माहिती ट्रकचालक निलेश गोसावी आणि किनर अंकुश बेंद्रे (रा. बारामती) यांनी दिली.

पोलिसांनी सांगितले की, पिंपळी (ता. बारामती, जि. पुणे) कंपनीचा दारुने भरलेला ट्रक घेऊन जळगांव येथे निघाला होता. पहाटे 4.30 च्या सुमारास चालकाला झोप लागल्याने ट्रक उंडवडी कप येथील पवार ढाब्यासमोर पलटी झाला. दारूचा ट्रक पलटी झाल्याची घटना परिसरात पसरली. त्यानंतर येथील नागरिकांनी पिशव्या भरुन दारुच्या बाटल्या भरुन पळून नेल्या. यात महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. पण, ड्रायव्हर व किनर यांना कोणीही गाडीतून बाहेर काढण्यासाठी मदत केली नाही. सकाळपर्यंत लोकांनी दारु पळवण्यावर सपाटा लावला. याबाबत माहिती समजताच बारामती ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. इतक्यात लोकांनी दारुच्या बाटल्या सोडून पसार झाले.

दरम्यान, गाडी चालक निलेश गोसावी आणि किनर अंकुश बेंद्रे यांनी लोकांनी दारु घेऊन जाऊ नये. असं म्हटल्यावर चालकाला मारहाण केली गेली. आणि लोकांनी गाडीची ताडपत्री हत्याराने फाडून पोतीच्या पोती दारु घेऊन गेले. विशेष म्हणजे यात महिला ही सामील झाल्याची माहिती गाडी चालकाने सांगितली आहे.

get_footer();