आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

घरफोडी करणारा सराईत चोरटा २४ तासांत जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 30, 2021
Spread the love

कोंढवा पोलिसांची कामगिरी : एक लाख ४ हजार रुपयांचा ऐवज जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : घरफोडी करून फरार झालेल्या सराईत चोरट्याला २४ तासांत कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून एक लाख ५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

कौसर अफसर सय्यद (वय २१, रा. नवाजीश पार्क, माविया मस्जिदशेजारी, कोंढवा खुर्द, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी संडे बाजार मैदानात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक लाख ४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने मिळून आले.

अधिक तपास केला असता, त्याने मक्का टॉवर साईबाबा मंदिराशेजारील घराचे कुलूप तोडून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी हा रेकॉर्डवरील आरोपी असून, पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

परिमंडल-५चे उपायुक्त, वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक पी. यू. कापुरे, तपास पथक अंमलदार सहाय्यक पोलीस फौजदार सय्यद, दीपक जडे, अमोल हिरवे, योगेश कुंभार, गणेश चिंचकर, अभिजित रत्नपारखी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.