आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

उरुळीकांचन येथील हत्याकांडातील मुख्य सूत्रधारास अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 31, 2021
Spread the love

लोणीकाळभोर पोलिसांची कामगिरी : आरोपीस दहा दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : उरुळीकांचन येथील हत्याकांडातील मुख्य सूत्रधारास अटक करण्यात लोणीकाळभोर पोलिसांना यश मिळाले असून, न्यायालयाने त्याची १० दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.

लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) दुपारी अडीचच्या सुमारास उरुळी कांचन येथे हॉटेल सोनाई समोर संतोष संपतराव जगताप (रा. राहु ता. दौंड जि. पुणे ) याच्यावर तीन अनोळखी इसमांकडून झालेल्या फायरिंगमध्ये संतोष जगताप हे जागीच मयत झाले असून, त्याचे अंगरक्षक शैलेंद्रसिंग व मोनुसिंग हे गंभीर जखमी झाले होते, तसेच संतोष जगताप यांच्या अंगरक्षकाकडून केलेल्या फायरिंगमध्ये मारेकऱ्यांपैकी एक मारेकरी जागीच ठार झाला होता. सदरबाबत लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.
सदर दाखल गुन्ह्यात यापूर्वी पवन गोरख मिसाळ (वय २९) आणि महादेव बाळासाहेब आदलिंगे (वय २६, दोघे रा. उरुळीकांचन ता. हवेली जि. पुणे) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासात त्यांनी सदरचा गुन्हा उमेश सोपान सोनवणे (रा. राहु ता. दौंड जि. पुणे) याच्या सांगण्यावरून कट रचून केल्याचे निष्पण झाले होते. परंतु उमेश सोनावणे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याचा शोध घेण्याकामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी तपास पथकास आदेश दिले होते. त्या अनुषंगाने तपास पथक यातील उमेश सोनावणे याचा शोध घेत असताना तपास पथक प्रमुख सहपोलीस निरीक्षक राजू महानोर यांना उमेश सोनावणे हा शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) कानीफनाथ हॉटेल, पिर फाटा, शिरुर जि. पुणे येथे येणार असलेबाबत गुप्त माहिती मिळाली.
सहपोलीस निरीक्षक राजू महानोर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना कळवून त्यांच्या आदेशाप्रमाणे तपास पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचून थांबले असताना बातमीप्रमाणे उमेश सोनावणे हा कानीफनाथ हॉटेल येथे आले नंतर तपास पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेतले आहे. उमेश सोनवणे यास सदर गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची १० दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगीरी ही, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी सहपोलीस निरीक्षक राजू महानोर, इन्स्पॅक्टर अमित गोरे, हवालदार नितीन गायकवाड, गणेश सातपुते, पोलीस नाईक अमित साळुंखे, श्रीनाथ जाधव, सुनील नागलोत, संभाजी देविकर, कॉन्स्टेबल बाजीराव विर, निखील पवार, शैलेश कुदळे, राजेशदराडे, दिगंबर साळुंके यांच्या पथकाने
केली आहे.