आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दिवाळी सणानिमित्त सर्व नागरिकांना आवाहन

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 2, 2021
Spread the love

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

बार्शी : दिवाळी सणानिमित्त बार्शी शहर पोलिसांनी सर्व नागरिकांना सतर्कतेसाठी आवाहन केले असून, या काळात कोणती सतर्कता बाळगावी, यासाठी सात मुद्दे सांगितले आहेत, तसेच गरज पडल्यास संपर्क साधन्याबाबतही कळवले आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी याबाबत आवाहन केले आहे.

  1. महिलांनी गर्दीच्या ठिकाणी आपापले दागदागिने, मौल्यवान वस्तू व लहान मुले व्यवस्थित सांभाळावेत.
  2. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोर व पाकीटमार यांचे पासून सावध राहावे.
  3. नागरिकांनी खरेदीस जाताना, आपली दुचाकी सुरक्षित ठिकाणी अथवा पार्कंगमध्ये पार्क करावी.
  4. दिवाळी सणामध्ये मोबाईल फोन अथवा इतर माध्यमांद्वारे प्राप्त होणारे विविध बक्षिसांच्या योजनांना तसेच आमिषांना बळी पडू नका.
  5. आपल्या बँकेचा व ए.टी.एम. कार्डवरील तपशील तसेच मोबाईल मध्ये प्राप्त होणारा ओ. टी.पी क्रमांक याची माहिती कोणालाही देऊ नका.
  6. वयोवृद्ध लोंकाना त्रास हाईल असे मोठ्या आवाजाचे फटाके वाजवू नका. फटाक्याची आतिषबाजी व ध्वनी प्रदूषण टाळा.
  7. दीपावलीच्या सुट्टीत गावी जाताना आपले शेजारी यांना घरावर लक्ष ठेवण्यास सांगावे, तसेच मौल्यवान वस्तू घरात ठेवू नये.

    -रामदास शेळके, पोलीस निरीक्षक, बार्शी शहर पोलीस ठाणे
    बार्शी शहर पोलीस ठाणे संपर्क क्रमांक : 02184223333