आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

१६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 1, 2021
Spread the love

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : सरबतातून गुंगीचे औषध देत केला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : लिंबु सरबतातून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. ही घटना ऑगस्ट २०२१ मध्ये घडली होती.

आदर्श महेश कुलकर्णी (वय १९, रा. धनकवडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद (७१९/२१) दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ऑगस्टमध्ये आरोपीने फिर्यादीला आपल्या फ्लॅटवर बोलावले होते. तेथे त्याने लिंबु सरबतातून गुंगीचे औषध दिले. त्यामुळे फिर्यादी बेशुद्ध झाल्या. तेव्हा आरोपीने तिच्यावर बलात्कार या शरीर संबंधातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक गुप्ता अधिक तपास करीत आहेत.