आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ट्रकला ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 3, 2021
Spread the love

लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल :दिवे घाटातील घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : दिवेघाटातील दुसऱ्या वळणावर सासवडकडे जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करताना दुचाकीचालकाचा ताबा सुटून अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. ही घटना १५ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री सव्वाएकच्या सुमारास घडली.

पंकज अंबादास कोळगे (वय २३, रा. बोराटेवस्ती, खराडी, पुणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश हुंडेकरी (वय २२, रा. खराडी, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, दिवे घाटातील दुसऱ्या वळणावर महेश हुंडेकरी मित्र पंकज अंबादास कोळगे मोटारसायकलवरून जात होते. ट्रकला ओव्हरटेक करताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. या अपघातात पंकज कोळगे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर पुढील तपास करीत आहेत.