पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता : मराठी गीत गायनाला उपस्थितांची भरभरून दाद
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : दीपोत्सव-२०२१ कार्यक्रमामध्ये मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम झाला. रंगतदार गायन कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी पोलीस अधिकारी-अंमलदार आणि उपस्थितांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
पोलीस आयुक्तालयाच्या वतीने दीपोत्सव-२०२१ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, सर्व पोलीस उपायुक्त व पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन, शाखेतील अंमलदार प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते. यावेळी आयुक्तालयातील सुमारे नऊ हजार पोलीस अधिकारी व अंमलदार, मंत्रालयीन कर्माचरी, सफाई सेवक यांना फराळ, पणती व पिशवीरूपी दिवाळी भेट देण्यात आली.
अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी प्रास्ताविक केले. सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने यांनी आभार मानले.
