आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दोन लाख रुपये खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा दाखल

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 6, 2021
Spread the love

कोंढवा पोलिसांत फिर्याद : पुण्यात स्नॅक सेंटरसाठी केला होता खर्च

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : स्नॅक सेंटर चालविण्यावरुन झालेल्या वादानंतर महिलेने स्नॅक सेंटर सोडून दिले. मात्र, तिच्या मुलाने या सेंटरसाठी खर्च केलेले २ लाख रुपये घेण्यासाठी जागा मालकाला फ्लॅट पाहिजे असल्याचे भासवून महिलेच्या नावाने फोन करुन बोलावून घेऊन धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

निखील प्रकाश भगत (वय ४०, रा. सनश्री सोसायटी, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी करण वाझ (वय २० व इतर तिघांविरुद्ध खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, भगत यांचे मिसळ दरबार नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये त्यांनी जेवण व स्नॅक असे दोन भाग केले होते. स्नॅक सेंटर चालविण्यासाठी त्यांनी ११ महिन्यांचा करार केला होता. मात्र, तीन महिन्यात त्यांच्यात वाद झाला. तेव्हा महिलेने स्नॅक सेंटर खाली करुन निघून गेल्या. त्यावेळी त्यांचा मुलगा करण वाझ याने फिर्यादी यांना स्नॅक सेंटरला खर्च केलेले २ लाख रुपये मागण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला. आरोपीने फिर्यादीस महिलेच्या फोनवरुन फोन करुन या महिलेस फ्लॅट पाहिजे असल्याचे भासवून फिर्यादीस रहेजा व्हिस्टा चौकात ४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात वाजता बोलावले. फिर्यादी तेथे गेल्यावर त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन २ लाख रुपयांची खंडणी मागितली. सहाय्यक पोलीस निरीक्षक बर्गे तपास करीत आहेत.