आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

उरुळी कांचन येथील हत्याकांडातील मुख्य आरोपी जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 5, 2021
Spread the love

लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी : खुन झाल्यानंतर झाला होता फरार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : उरुळी कांचन येथे २२ ऑक्टोबर २०२१ रोजी फायरिंगमधील मुख्य आरोपीच्या लोणी काळभोर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.

संतोष जगताप (रा. राहू, ता. दौंड, जि. पुणे) यांच्यासह एका मारेकऱ्याचा जागीच मृत्यू झाला होता, तर अंगरक्षक गंभीर जखमी झाले होते. दोघांचा जागीच मृत्यू झाला होता, या गुन्ह्यातील पवन गोरख मिसाळ (वय २९) व महादेव बाळासाहेब आदलिंगे (वय २६, दोघे रा. उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) यांना दोघांना अटक केली. या खुनाचे मुख्य आरोपी कानिफनाथ हॉटेल, पिर फाटा, ता. शिरुर, जि. पुणे येथे येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील,सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, अमित गोरे, नितीन गायकवाड, गणेश सातपुते, अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनील नागलोत, संभाजी देवीकर, बाजीराव वीर, निखील पवार, शैलेश कुदळे, राजेश दराडे, दिगंबर साळुंके यांच्या पथकाने ही कारवाई केली.