दत्तनगर-नऱ्हे रस्त्यावर घडली घटना : सायकल खेळताना उतारावरुण गेला अचानक तोल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सायकल खेळत असताना उतारावरुण तोल जाऊन नाल्याच्या लोखंडी रेलिंगला धडकून एका 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना दत्तनगर-नऱ्हे रस्त्यावर बुधवारी सकाळी 10.30 वाजता घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले की, दत्तनगर येथे रहाणारी दोन मुले उतारावरुण सायकल खेळत चालले होते. यावेळी एका मुलाचा तीव्र उतारावरुण तोल गेल्याने तो नाल्याच्या कडेला लावलेल्या लोखंडी रेलिंगला धडकला. त्याच्या डोक्याता मार लागल्याने तो बेशुध्द झाला. दुसऱ्या मुलाने आरडा ओरडा केल्यावर जमलेल्या नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. खासगी रुग्णालयात त्याला मृत घोषीत करण्यात आले.
मुलाचे वडिल कात्रज परिसरात टाईल्सचा ठोक व्यापार करतात. ते दत्तनगर येथील विंडसर काऊंटी येथे रहातात. तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मागील आठवड्यातच नाल्यात एक रिक्षाही पलटी झाली होती.
