आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

नवरा हॉस्पिटलमध्ये असल्याचं समजताच नराधमांनी केली ‘गेम’

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 9, 2021
Spread the love

राजगड पोलिसांनी तिघांना केले अटक : 29 वर्षाच्या विवाहितेला गोठयात डांबून ‘गँगरेप’

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. भोर तालुक्यातील (जि. पुणे) गावातील घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 29 वर्षाच्या विवाहित महिलेवर गावातील दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिलेचा पती रुग्णालयात उपचार घेत असताना नराधमांनी डाव साधला.

राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून, पीडित महिलेने शनिवारी (दि.7) फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. अनिल वाडकर, महेश सोनवणे आणि हनुमान कापरे (रा. भांबवडे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, संबंधित घटना 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. यावेळी पीडित महिलेचे पती शिरवळ येथील एका रुग्णालयात उपचार घेत होते. त्या दरम्यान फिर्यादी शेतात जाताना आरोपींनी फिर्यादीच्या पतीने मोबाईल चार्जर व पँट मागितल्याचे सांगितले. त्यावर स्वत: जाऊन देईन, असे पीडितेने सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी तिला धमकी देऊन निघून गेले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.