• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

लाचखोर उपायुक्त नितीन ढगेच्या घरात सापडले 2.81 कोटींचं ‘घबाड’

November 30, 2023
0
Sept 2018 Issu8
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

‘बेनामी’चा होणार पर्दाफाश : वानवडीतील ढगेंच्या घरी कारवाई करून केले अटक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : तक्रारदारांच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करुन ते वैध करण्यासाठी उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य नितीन चंद्रकांत ढगे (वय-40) यांना 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतबिंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी रात्री 9.40 वाजता वानवडी येथील ढगे यांच्या घराजवळ सापळा रचून अटक करण्यात आली.

त्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ढगे यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता तब्बल पावणे तीन कोटी रुपयांचे घबाड पथकाच्या हाती लागले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

नितीन ढगे यांना अटक केल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या राहत्या घराची रात्रभर झडती घेतली. रविवारी त्यांच्या घराची झडती संपली. या झडतीमध्ये रोख 1 कोटी 28 लाख 49 हजार रुपये, मालमत्तांची कागदपत्रे यासह 2 कोटी 81 लाख 89 हजार रुपयांची मालमत्ता मिळून आली आहे. कारवाई दरम्यान आढळून आलेल्या रकमेपैकी किती रक्कम वैध आणि किती अवैध आहे याची तपासणी सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

काय आहे प्रकरण ?…

तक्रारदार यांच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. ते प्रमाणपत्र वैध करण्याकरीता ढगे याने 8 लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली.

त्यात ढगे यांनी तडजोड करुन 3 लाख रुपये लाच मागून तडजोडीत 2 लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तक्रारदार यांना ढगे यांनी पैसे देण्यासाठी वानवडीतील आपल्या निवासस्थानाजवळ बोलाविले होते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडून प्रत्यक्षात 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना ढगे यांना पकडण्यात आले. वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली.

दरम्यान, नितीन ढगेंची अनेक ठिकाणी बेनामी प्रॉपर्टी असल्याची चर्चा रंगली आहे. ढगे यांच्या मुळ गावी आणि इतर ठिकाणांवर प्रॉपर्टीची माहिती घेण्यात येत आहे. अ‍ॅन्टी करप्शनचे अधिकारी त्याची देखील माहिती घेत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुरज गुरव, अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे, पोलीस शिपाई अंकुश आंबेकर, सौरभ महाशब्दे, चंद्रकांत कदम यांच्या पथकाने केली आहे.

09 11 2021 news 4
Download

Latest Articles

दि पूना मर्चंट्स चेंबरचे ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ जाहीर

दि पूना मर्चंट्स चेंबरचे ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ जाहीर

March 5, 2026
गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ वकिलाला १४ कोटींना गंडा

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ वकिलाला १४ कोटींना गंडा

March 5, 2026
प्रीतम प्रकाश महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ संपन्न

प्रीतम प्रकाश महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ संपन्न

March 5, 2026
गर्भलिंगनिदान करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

गर्भलिंगनिदान करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

March 5, 2026

२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

March 5, 2026
Load More
Previous Post

ससून रुग्णालयात महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणारा अटकेत

Next Post

हडपसर-तुकाईदर्शन येथे तलवारीने वार करणारे तिघे जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ वकिलाला १४ कोटींना गंडा

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ वकिलाला १४ कोटींना गंडा

March 5, 2026
प्रीतम प्रकाश महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ संपन्न

प्रीतम प्रकाश महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ संपन्न

March 5, 2026
गर्भलिंगनिदान करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

गर्भलिंगनिदान करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

March 5, 2026
२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

March 4, 2026
जीएसटी अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाखांची फसवणूक

जीएसटी अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाखांची फसवणूक

March 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
दि पूना मर्चंट्स चेंबरचे ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ जाहीर

दि पूना मर्चंट्स चेंबरचे ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ जाहीर

March 5, 2026
गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ वकिलाला १४ कोटींना गंडा

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ वकिलाला १४ कोटींना गंडा

March 5, 2026
प्रीतम प्रकाश महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ संपन्न

प्रीतम प्रकाश महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ संपन्न

March 5, 2026
गर्भलिंगनिदान करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

गर्भलिंगनिदान करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

March 5, 2026

२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

March 5, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

दि पूना मर्चंट्स चेंबरचे ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ जाहीर

दि पूना मर्चंट्स चेंबरचे ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ जाहीर

March 5, 2026
गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ वकिलाला १४ कोटींना गंडा

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ वकिलाला १४ कोटींना गंडा

March 5, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta