आवृत्ती पुणे
← Back to Homepage

16 वर्षाच्या मुलीशी 19 वर्षीय तरुणाचं ‘झेंगाट’

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 9, 2021
Spread the love

चंदननगर पोलिसांनी केली एकाला अटक : आई बनल्यावर युवक आला ‘गोत्यात’

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून एका १६ वर्षाच्या मुलीबरोबर वारंवार शारिरीक संबंध ठेवून तिला गर्भवती केले. त्यातून या १६ वर्षाच्या मुलीने एका अर्भकाला जन्म दिला आहे. चंदननगर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली.

याप्रकरणी वडगावशेरी येथील एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी हे जवळजवळ राहतात. आरोपीने फिर्यादीच्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला आपल्या घरी वारंवार नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. हा प्रकार उशिरा लक्षात आल्याने तिला मुलाला जन्म देणे भाग पडले. ही मुलगी नुकतीच आई झाली असून त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरुन पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.