आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सायबर चोरट्याचा ज्येष्ठ नागरिकाला 5 लाखांचा गंडा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 14, 2021
Spread the love

उंड्रीतील ज्येष्ठाला फसविले : पॅन कार्ड टाईप करून लुबाडण्याची नवी पद्धती

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सायबर चोरटे हे नेहमी नवनवीन फंडे काढून लोकांना फसवून गंडा घालत असतात. एका पद्धतीची लोकांना माहिती झाली की, ते दुसरा नवा प्रकार काढतात. लोकांचा विश्वास संपादन करुन त्यांचे बँक खाते रिकामे करतात. कोंढव्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला बँक खाते ब्लॉक केल्याचा टेक्स मेसेज पाठवून लिंक पाठवून पॅनकार्ड टाईप करायला लावून तब्बल ५ लाखांना गंडा घातला आहे.

याप्रकरणी उंड्री येथील एका ५७ वर्षाच्या गृहस्थाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या मोबाइल फोनवर एसबीआय युझर अकाऊंट ब्लॉक केल्याचा टेक्स मेसेज पाठविला. त्यांना एक लिंक शेअर करुन त्यावर लॉगिन करुन नेट बॅकिंग अपडेट करुन तुमचा पॅन नंबर टाकण्यास सांगितले. त्यानुसार या नागरिकाने दिलेल्या लिंकवर जाऊन पॅनकार्ड क्रमांक टाईप केला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यावरुन ५ लाख ४ हजार ३४२ रुपये ट्रान्सफर करुन सायबर चोरट्यांनी फसवणूक केली. पोलीस निरीक्षक राऊत अधिक तपास करीत आहेत.