कदम : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केले कौतुक
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सायकलिंग एक मजेदार अनुभव आहे. ज्यामध्ये लांब आणि हवेशीर मोकळ्या मार्गावर सायकलिंग केल्याने अनेक रोगांपासून मुक्तता मिळते आणि कित्येक किलो वजन देखील कमी होते. वजन कमी करण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. सायकलिंग शरीरासाठी अनेक मार्गांनी फायदेशीर ठरते. सायकलिंग करून, बऱ्याच प्रकारचे रोग सहजपणे टाळता येतात आणि बऱ्याच घातक रोगांसाठी सायकल चालवणे हे एक अतिशय उपयुक्त व्यायाम आहे, असे मत लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी व्यक्त केले.
कदम म्हणाले की, भक्तीशक्ती चौक- तळेगाव दाभाडे- भक्तीशक्ती चौक अशी ५० किमी सायकलिंगचे नियोजन होते. पोलीस उपनिरीक्षक रोहिदास कदम, कैलास चव्हाण, प्रमोद गायकवाड, समीर तांबोळी, सचिन मांजरे, निकेश सोयम यांनी सायकलिंगमध्ये सहभाग घेतला. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील म्हाळुंगे पोलीस चौकीतील पोलीस नाईक, अमोल मारुती निघोट, भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील निलेश त्रिंबक अरगडे यांची भेट झाली. त्यांनीही ५० किमीचे रजिस्ट्रेशन केले असून, आम्ही २५ किमी जाणार असल्याचे सांगितले.
आम्ही पहिल्यांदाच सायकलिंग करीत असल्याचे कारण दिले. तेव्हा त्यांना सायकलिंग टेक्निक्स व मानसिक ऊर्जा कशी वाढवायची यांचे मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा ५० किमी अंतर पूर्ण केले. एवढ्यावर ते थांबले नाही, तर त्यापुढे जाऊन आठ किमी अंतर पुन्हा सायकलिंग केले. सायकल्याथॉनचे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सायकलिंगचे कौतुक केले.
