आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ज्येष्ठ साहित्यिक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue, Social • November 16, 2021
Spread the love

अमिताभ गुप्ता : पोलिसांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात साधला जवळून संवाद

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. पुणे शहरातील पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यनंतर त्यांच्यासमवेत काही काम करम्याची संधी मिळाली हे, माझे भाग्य आहे, अशा शब्दात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले की, पुणे पोलिसांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. तेव्हा त्यांच्याशी जवळून संवाद साधता आला. दिवंगत बाबासाहेबांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये माझ्यासह पुणे पोलीस दल सहभागी आहोत, असे त्यांनी सांगितले.