आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

२०-२० वर्ल्ड कप क्रिकेट बेटिंग करणारे दोघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 16, 2021
Spread the love

सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई : चार लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : २०-२० कोंढवा रोडवरील बिबवेवाडीतील अपार्टमेंटमध्ये वर्ल्ड कप फायनल २०२१ ऑनलाइन क्रिकेट बेटिंग करणाऱ्या दोघांना अटक केली. सामाजिक सुरक्षा विभागातील गुन्हे शाखेने ही कारवाई केली. त्यांच्याकडून चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ओंकार राजू समुद्रे (वय २५, रा. हुडको कॉलनी, ता. शिरूर, जि. पुणे, सध्या रा. विष्णू विहार अपार्टमेंट, बिबवेवाडी, कोंढवा रोड, पुणे), निकित अजित बोथरा (वय २६, रा. हुडको कॉलनी, ता. शिरूर, जि. पुणे, सध्या रा. भिमाली कॉम्प्लेक्सजवळ सॅलिसबरी पार्क, रोझ अपार्टमेंट)
पोलिसांनी सांगितले की, कोंढवा रोडवरील बिबवेवाडीतील विष्णू-विहार अपार्टमेंटमध्ये ऑनलाइन क्रिकेट बेटिंग सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेऊन अटक केले. त्यांच्याकडून मोबाईल हँडसेट, लॅपटॉप असा एकूण चार लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, महिला पोलीस अंमलदार शिंदे, पुकाळे, माने, मोहिते, कांबळे, चव्हाण, कोळगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.