आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पं. जवाहरलाल नेहरू जयंतीदिनी बालदिन साजरा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 16, 2021
Spread the love

लिओ क्लब बार्शी तर्फे उपक्रम :बार्शी शहर पोलीस ठाण्याला दिली भेट

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

बार्शी : बालकांना पोलीसांच्या कामकाजाबद्दलची माहिती मिळावी, पोलीसांचे काम कसे चालते पोलीस प्रशासन म्हणजे काय, तसेच पोलीसांप्रती आत्मीयता असली पाहिजे, या विचाराने हा उपक्रम लिओ क्लब बार्शी तर्फे राबविण्यात आला.असे लिओ क्लब अध्यक्ष पवन श्रीश्रीमाळ यांनी सांगितले.

भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता.14) बार्शी शहर पोलीस ठाण्यात लिओ क्लब बार्शी टाऊनच्या वतीने बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या हस्ते उपस्थित बालकांना गुलाबपुष्प देण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या स्मिता देशपांडे तसेच पोलीस महिला कर्मचारी शबाना कोतवाल व आरती खोत उपस्थित होत्या.

सामाजिक कार्यकर्त्या विनिता भानुशाली यांनी बालकांना बाललैगिंक शोषणाबद्दल मार्गदर्शन करत बालक व पालकांना सजग राहण्याबाबत यावेळी संदेश दिला. महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल सिंधु देशमुख यांनी संतुलीत आहार – विहार विविध खेळ प्रकार व व्यायामाचे महत्व सांगितले. सहाय्यक फौजदार गुळमे व भालेराव यांनी बालकांना पोलीस शस्त्राबद्दल व कारागृहाची माहिती दिली.

प्रकल्प प्रमुख स्नेहल कुकूंलोळ यांनी सूत्रसंचालन केले. लिओ क्लब बार्शीचे सचिव आदित्य सोनिग्रा यांनी आभार मानले.
पोलीस ठाणे भेटीच्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी लिओ क्लबचे खजिनदार अक्षित परमार सदस्य गौरव देढीया, डॉ.वत्सल राठोड, विधी कोठारी, ऋषभ गुंदेचा, स्वराज लोखंडे, श्रेणीक गुंदेचा यांनी परिश्रम घेतले.