आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेची ‘कौमार्य’ चाचणी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 21, 2021
Spread the love

पतीसह चौघांवर गुन्हा दाखल : पुण्यातील बंडगार्डन पोलिसात विवाहितेने दिली फिर्याद

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : लग्न झाल्यानंतर चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीची कौमार्य चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ करुन तिला माहेरी हाकलून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी एका २५ वर्षाच्या विवाहितेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ४ जून २०१७ ते जानेवारी २०२१ दरम्यान छळवणूक होत होती.

पीडित विवाहितेचा पती आकाश शिंदे (वय २६, रा. ठाणे) याच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, छळवणूकीचा हा प्रकार ४ जून २०१७ ते जानेवारी २०२१ दरम्यान घडला. आरोपी यांनी फिर्यादीस लग्न झालेपासून वेळोवेळी चारित्र्यावर संशय घेऊन फिर्यादीची कौमार्य चाचणी केली. तसेच फिर्यादी यांना मुलगी झाली म्हणून घरातील सर्व कामे करायला लावून उपाशी ठेवले. फिर्यादीचा पती आकाश हा दारु पिऊन शिवीगाळ करुन मारहाण करीत. तसेच त्यांना जानेवारीमध्ये माहेरी पाठवून दिले. त्यानंतर अद्यापपर्यंत घेण्यास आले नाही. फिर्यादी या स्वत: गेल्या असता आरोपी यांनी त्यांचे घर बदलले आहे. तसेच फिर्यादीचे घराच्यांचे फोन घेण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन मानसिक व शारिरीक छळाची तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सपकाळे तपास करीत आहेत.