आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पिकअपच्या धडकेत दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 21, 2021
Spread the love

लोणीकंद पोलिसांत फिर्याद : वाघोलीतील पानमळा येथील पुणे-नगर लेनवरील घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : दुचाकीला पाठीमागून पिकअपची जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक जखमी झाला असून, दोन वर्षांचा लहान मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना वाघोलीतील पानमळा कमलबाग सोसायटीसमोर पुणे-नगर लेनवर शुक्रवारी (१९ नोव्हेंबर २०२१) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

श्रेयस युवराज कोकणे (वय २, रा. लोणीकंद, ता. हवेली, जि. पुणे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी विवेक सूर्यवंशी यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा मित्र विवेक अनिल सूर्यवंशी (रा. लोणीकंद, ता. हवेली, जि. पुणे) यांच्या मामाचा मुलगा श्रेयस मोटारसायकलवरून खराडीला जात होते. त्यावेळी पिकअपची मोटारसायकलला जबर धडक बसून अपघात झाला. या अपघातात फिर्यादीला किरकोळ जखमी झाला, तर श्रेयस कोकणे याला जबर मार लागला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे पुढील तपास करीत आहेत.