आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मागिल आठ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा पोलिसांच्या जाळ्यात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 24, 2021
Spread the love

युनिट-४ची कारवाई : कोंढव्यातील गोडावून फोडून मूळ गावी बिहारमध्ये गेला होता पळून

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

मागिल वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीस युनिट-४च्या पथकाने पिंपळे सौदागर येथील कृष्णा चौकात सापळा रचून जेरबंद केले. मागिल आठ वर्षांपूर्वी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत गोडावून फोडून बिहारमध्ये पळून गेला होता.

दयानंद झा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.


पोलिसांनी सांगितले की, कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील गोडावून फोडून आरोपी मूळ गावी बिहारमध्ये पळून गेला होता. तो पुन्हा पिंपरी (चिखली) येथे वास्तव्यास असून, तो पिंपळे सौदागर येथील कृष्णा चौकात येणार असल्याची माहिती युनिट-४मधील पोलीस पोलीस हवालदार राजस शेख यांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले असता त्याने साथीदारासह केलेल्या गुन्ह्याची आणि बिहारमध्ये पळून गेल्याची कबुली दिली.


पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शोभा क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार राजस शेख, दीपक भुजबळ, प्रवीण भालचिम, प्रवीण कराळे, शीतल शिंदे, महेंद्र पवार, स्वप्नील कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.