आवृत्ती पुणे
← Back to Homepage

राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याला ४ लाखाच्या खंडणीची मागणी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 24, 2021

खंडणी विरोधी पथकाची कारवाई : चार लाख घेताना तिघांना रंगेहात पकडले

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : प्लॉटवर टाकलेला राडा रोडा उचलण्यासाठी ४ लाख रुपयांची खंडणी मागून ती घेत असताना खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून तिघा जणांना रंगेहाथ पकडले.

दीपक विजय निंबाळकर (वय २९, रा. निंबाळकरवस्ती, पिसोळी, ता. हवेली), गणेश जगताप (वय २८, रा. महम्मदवाडी, हडपसर) आणि अमर अबनावे (वय २९ रा. उरळी देवाची) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी जुबेर बाबु शेख (वय ४१, रा. काशेवाडी, भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. जुबेर शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर चिटणीस आहेत. त्यांचा प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. फिर्यादी यांचे पिसोळी येथे दोन ठिकाणी मिळकती आहेत. त्याकडे जाणार्‍या रस्त्यावर दिपक निंबाळकर याने राडारोडा टाकला होता. तो राडारोडा उचलण्यासाठी फिर्यादी व त्यांचा मित्र सचिन ननावरे यांनी फोन करुन सांगितले. हा राडारोडा उचलण्यासाठी दीपक निंबाळकर व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांच्याकडे ४ लाख रुपयांची मागणी केली. त्यांना पैसे घेऊन कोंढवा कात्रज रोडवरील कान्हा हॉटेल येथे बोलावले. शेख यांनी याची तक्रार खंडणी विरोधी पथकाकडे केली. सोमवारी दुपारी शेख हे ४ लाख रुपये घेऊन कान्हा हॉटेल येथे गेले. शेख यांच्याकडून खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी तिघांना सापळा रचून पकडले. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाचे (2) पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, श्रीकांत चव्हाण, गुरव, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंखे, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे, सैदोबा भोजराव, अमोल पिलाने, प्रविण पडवळ, प्रदीप गाडे, चेतन शिरवळकर, रुपाली कर्णावर यांच्या पथकानं आरोपींना अटक केली आहे.

get_footer();