आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सात महागड्या दुचाकी चोरणाऱ्या सराईताला ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 7, 2021
Spread the love

गुन्हे शाखेच्या युनिट-३ची कारवाई : पोलीस कोठडीत तपासामध्ये सहा गुन्हे झाले उघड

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील महागड्या दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. सराईत गुन्हेगाराकडून तीन लाख रुपये किमतीच्या 7 दुचाकी जप्त केल्या आहेत. गुन्हे शाखेने ही कारवाई अम्रपाली हॉटेल जवळ असलेल्या सार्वजनिक रोडवर केली. आरोपीला अटक करुन पुण्यातील 6 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

अक्षय मारुती कापडी (वय-22 रा. मु. पारगाव शिंगवे, पोस्ट अवसरी बु. ता. आंबेगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक केलेल्या आरोपीने स्वारगेट, भारती विद्यापीठ, दत्तवाडी, कोथरुड, वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाड्या चोरल्या आहेत. पोलिसांनी दुचाकी जप्त करुन 6 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

गुन्हे शाखा युनिट-३चे पथक वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात पेट्रोलींग करत असताना तांत्रिक विश्लेषणावरुन आरोपीची माहिती मिळाली. आरोपी आम्रपाली हॉटेल शेजारी महामार्गाच्या लगत असलेल्या सर्व्हिस रोडवर उभा असून त्याच्याकडे असलेली के.टी.एम दुचाकी कर्वेनगर येथून चोरली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेली के.टी.एम. दुचाकी जप्त करुन गुन्ह्यात अटक केली. त्याला न्यायालयात हजर करुन त्याची पोलीस कोठडी घेऊन सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडून तीन लाख रुपयांच्या 6 दुचाकी जप्त केल्या.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार महेश निंबाळकर, संतोष क्षीरसागर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, विल्सन डिसोझा, सुजीत पवार, कल्पेश बनसोडे, संजीप कांबळे, ज्ञानेश्वर चित्ते, प्रकाश कट्टे, दीपक क्षिरसागर, राकेश टेकावडे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.