आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अफीमच्या बोंडाचा चुरा बाळगणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 7, 2021
Spread the love

अंमली पदार्थविरोधी पथक-१ची कारवाई : राजस्थान, सासवड येथे छापा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अफीमच्या बोंड्याचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ अंमलीपदार्थ बाळगणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या. आरोपींकडून ७२ हजार रुपये किमतीचा ६ किलो १५४ ग्रॅम पॉपीस्ट्रॉ अंमलीपदार्थ जप्त केला. जोधपूर (राजस्थान) व सासवड (पुणे) येथे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक-२ने कारवाई केली.

महेश हरमलराम बिष्णोई (वय ३०, रा. आचल पार्क, पापडेवस्ती, काळेपडळ, हडपसर, मूळगाव तहसील ओशिया, जि. जोधपूर, राजस्थान), विकास प्रधानराम डारा (वय २०, रा. पांडुरंग मार्बलसमोर, हिवरे रोड, डॉ. खाडे यांचे घर, सासवड, पुणे) आणि सिद्धार्थ धनपाल पाटील (वय ३२, रा. सोपाननगर, हडको, सासवड) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अंमली पदार्थविरोधी पथक गस्त घालत होते. त्यावेळी महेश हरमलराम बिष्णोई याच्याकडे एक किलो ५९४ ग्रॅम अफीमच्या बोंडांचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ आढळून आला. त्याच्याकडे तपास केला असता, त्याने अंमली पदार्थ विकास प्रधानराम डारा याने दिल्याचे सांगत दोडाचुरा कुठे ठेवल्याची माहिती दिली. त्याप्रमाणे पोलिसांनी सासवड येथे छापा टाकून कारवाई केली असता, विकास डारा याच्या घरामध्ये दोन किलो ५३४ ग्रॅम अफीमच्या बोंडांचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ सुमारे तीस हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ आढळून आला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अंमली पदार्थ सिद्धार्थ धनपाल पाटील याने दिला असून, त्याच्याकडे एक किलो ९८७ ग्रॅम अफीमच्या बोंडांचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ असा एकूण २४ हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ आढळून आला. या तिघांना अटक करून हडपसर पोलीस स्टेसनमध्ये गुन्हा दाखल केला. तिघांकडून ६ किलो १५४ किलो १५४ ग्रॅम वजनाचा अफीमची बोंडे व बोंडांचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ असी एकूण ७२ हजार रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थविरोधी पथक गुन्हे-२चे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, मयूर सूर्यवंशी, चेतन गायकवाड, संतोष जाचक, संदीप शेळके, साहिल शेख आझीम शेख, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, योगेश मांढरे, दिनेश बास्टेवाड, महिला पोलीस अंमलदार दीशा खेवलकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.