आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

किरकोळ वादातून संतापलेल्या पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 8, 2021
Spread the love

खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : पुण्यातील भवानी पेठेत घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कात्रज परिसरात सोमवारी भरदिवसा गोळ्या घालून एकाचा खून केल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी एक खूनाची घटना घडली आहे. सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या खूनाच्या घटनेमुळे पुणे हादरलं आहे. किरकोळ कारणावरुन झालेल्या पती आणि पत्नी यांच्यात झालेला वाद विकोपाला गेला. या वादानंतर संतापलेल्या पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भवानी पेठ परिसरात ही घटना घडली आहे.

आसमा हवारी असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पती हौसिफ हवारी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी सांगितले की, मुलं भांडण करतात आणि त्रास देतात या कारणावरुन पती-पत्नीमध्ये सोमवारी रात्री वाद झाला होता. हा वाद एवढा विकोपाला गेला की दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यानंतर संतापलेल्या पतीने रागाच्या भरात पत्नीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यानंतर संपूर्ण कुटुंब झोपी गेले. आज सकाळी पत्नी आसमा उठत नसल्याने आरोपी पती तिला उठवण्यासाठी गेला. त्यावेळी तिचे संपूर्ण अंग गार पडले होते. त्यानंतर पत्नीचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.