आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

नोकरानीने घरमालकीणीला गुंगीचं औषध देऊन लाखोंचा ऐवज पळवला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 10, 2021
Spread the love

हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल : बावधनमधील गोल्डन आर्च सोसायटीमधील प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : घरकाम करणाऱ्या नोकरानीने घराच्या मालकिणीला आणि त्यांच्या दोन मुलांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर नोकरानीने घरातील कपाटातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील बावधन येथील गोल्डन आर्च सोसायटीमध्ये रात्री सव्वाबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी हितेश सुभाषचंद्र धिंग्रा (वय-46 रा. रो हाऊस 2 बी, गोल्डन आर्च सोसायटी, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किशोर व त्याची पत्नी पूजा (दोघे रा. नेपाळ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश धिंग्रा यांची बहीण श्रुती रवी खोसला यांच्या घरात आरोपी किशोर आणि त्याची पत्नी पूजा दोघेजण घरकाम करत होते. आरोपींनी श्रुती आणि त्यांच्या दोन मुलांना गुंगीकारक औषध दिले. त्यामुळे ते तिघे बेशुद्ध झाले. त्यानंतर आरोपींनी घरातील लोखंडी लॉकर तोडून तसेच लाकडी कपाट उघडून दीड लाख रुपये रोख रक्कम, सोन्याचे दागिने चोरून नेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर करीत आहेत.