हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : हडपसर-माळवाडी रस्त्यावर अपघात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बिल्ला बाँग इंटरनॅशनल हायस्कूल समोरील माळवाडी-हडपसर रस्त्यावर दोन मोटारसायकलची धडक बसून अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे.
अभिजित चंद्रकांत शिंदे (रा. शेवाळेवाडी-मांजरी, ता. हवेली, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश टकले (वय २१, रा. कामठेवस्ती, माळवाडी-हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, पोलिसांनी सांगितले की, मृत्युमुखी पडलेल्या अभिजित शिंदे यांच्या भरधाव वेगातील मोटारसायकलची धडक फिर्यादी सुरेश टकले यांच्या मोटारसायकलला बसून अपघात झाला. या अपघातात दोघांच्या मोटारसायकलचे नुकसान झाले, फिर्यादी जखमी झाला, तर मयत आरोपी गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर करीत आहेत.
