अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा जेरबंद
गुलटेकडी परिसरातील घटना : ड्रेनेजचे काम करणाऱ्या कामगाराने घरात शिरून केले कृत्य
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : ड्रेनेज लाईनचे काम करण्यासाठी आलेल्या कामगाराने घरात शिरुन एका 15 वर्षाच्या मुलीबरोबर अश्लिल कृत्य करुन तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार गुलटेकडी येथे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता घडला.
याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गणेश सुभाष हेगडे (रा. वडगाव बुद्रुक) याला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी 15 वर्षाची मुलगी त्यांचे घराचे खालून पाणी भरत होती. ड्रेनेज लाईनचे काम करणारा गणेश हा कळशी देण्याचा बहाणा करुन ती घरात एकटी असल्याचे पाहून तो घरात आला.
येथे खाली ओले करु नका असे बोलून तिच्या कमरेला हात लावून लज्जास्पद कृत्य केले. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी पुन्हा घरामध्ये येऊन तुझी कळशी खाली नळावर राहिली होती. ती द्यायला आलो, असे बोलून तिचे तोंड दाबून तिने घातलेला टी शर्ट वर करुन तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक साबळे अधिक तपास करीत आहेत.
