आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कोंढव्यातील त्या बंगल्यावर पोलिसांचा छापा!

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 12, 2021
Spread the love

५८ लाखांचा ऐवज जप्त : सामाजिक सुरक्षा पथकाची मोठी कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कोंढव्यातील सैनिकनगर परिसरातील क्लाऊड नाईन सोसायटीमधील बंगल्यात वास्तव्यास राहणाऱ्या जितेन जगदिप सिंग याच्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने मोठी कारवाई केली आहे. त्याच्या बंगल्यातून विदेशी दारूच्या बाटल्या, पोकर जुगाराची साधने, 46 लाख 76 हजार 500 रूपये आणि ऑस्ट्रेलियन 5500 डॉलर तसेच 6700 युएस डॉलर असा एकुण 58 लाख 30 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जितेन जगदिप सिंग हा पोकर खेळत असून त्याच्याकडे जुगार खेळण्यास येणाऱ्यांना तो विदेशी दारू पुरवित असल्याची बाबतची गोपीनय माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली होती. सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण आणि अंमली पदार्थ विरोधी पथक – 1 चे निरीक्षक विनायक गायकवाड यांनी प्राप्त माहितीची खातरजमा केली. जितेन सिंग याच्या बंगल्यातील आणि त्याच्याकडे असलेल्या विदेशी दारूच्या बाटल्या, पोकर जुगाराची साधने, 13 पोकर टेबल, 30 पत्त्याचे कॅटचे बॉक्स आणि रोख 47 लाख 76 हजार 500 रूपये तसेच विदेशी चलन असा एकुण 58 लाख 30 हजार 275 रूपयाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. जितेन सिंग याच्याविरूध्द कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अप्पर आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शिल्पा चव्हाण, पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, परिविक्षाधिन उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे, विशाल शिंदे, सचिन तरडे, पोलिस अंमलदार मोहिते, पुकाळे, चव्हाण, पठाण, कोळगे तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-१ मधील जाधव, पवार, उत्तेकर, साळुंके, पारधी, शेख आणि मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.