आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

एकाच फ्लॅटवर आठ बँकां व फायनान्सकडून गृहकर्ज काढणाऱ्यावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 14, 2021
Spread the love

विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : हप्ता थकल्यानंतर प्रकार उघडकीस

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : गृहकर्ज घेतल्यानंतर काही हप्ते भरल्यावर कर्जदारांनी हप्ते भरण्याचे बंद केले. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर तो होऊ शकला नाही. तेव्हा एका फायनान्स कंपनीच्या अधिकार्‍याने ज्या फ्लॅटवर कर्ज घेतले. त्याला भेट दिली तर त्याला मोठा धक्का बसला. ज्या फ्लॅटवर त्याने गृहकर्ज दिले होते. त्यावर तब्बल इतर ७ सरकारी व खासगी, सहकारी बँकांकडून अगोदरच कर्ज घेतले असल्याचे व त्या बँकांनी नोटीसा लावल्याचे आढळून आले.

याप्रकरणी जयदीप बिश्नोई (वय २६, रा. विमाननगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन विमानतळ पोलिसांनी प्रकाश देवेंद्र खंडेलवाल (वय ३८), प्रियंका प्रकाश खंडेलवाल (वय ३५) आणि देवेंद्र नारायण खंडेलवाल (वय ६५, सर्व रा. विमाननगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश आणि प्रियंका खंडेलवाल यांनी विमाननगरमधील निको एन एक्स सोसायटीतील तिसर्‍या मजल्यावरील फ्लॅटवर ५५ लाख रुपयांचे आवास फाईनेसर्स लि. यांच्याकडून गृहकर्ज घेतले. २०१५ मध्ये त्यांनी हे कर्ज घेतले. त्यासाठी १९४ मासिक हफ्त्यात परतफेड करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यापैकी ५१.१७ मासिक हप्ते त्यांनी सुरळीत भरले. त्यानंतर कोठलीही रक्कम भरली नाही. फिर्यादी यांनी रक्कम का भरली नाही, याची चौकशी करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ते रहात असलेल्या घरी मिळून आले नाही. त्यामुळे फिर्यादी हे गृहकर्जासाठी गहाण ठेवलेल्या निको एन एक्स सोसायटी येथे गेले.

तेथे जाऊन पाहणी केल्यावर त्या फ्लॅटवर कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, कॉसमॉस बँक,
अ‍ॅक्सीस बँक इत्यादी बँकेचे या मालमत्तेवर कर्ज असल्याबाबतच्या नोटीस लावल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. बँकेचे हप्ते थकल्यानंतर आरोपीने आर्थिक गैर लाभापोटी फिर्यादी यांच्या आवास फाईनेसर्स कंपनीला खोटी माहिती देऊन ही मालमत्ता गहाण असतानाही कंपनीची फसवणूक केली. न्यायालयाच्या आदेशानुसार विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.