बार्शी बार असोसिएशनची निवडणूक : सचिवपदी नरेंद्र घोडके विजयी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बार्शी : कोरोना महामारीमुळे दोन वर्ष बार असोसिएशनच्या निवडणुका झाल्या नव्हत्या, त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत बार्शी वकील संघाचे अध्यक्षपदी ॲड. अविनाश जाधव, उपाध्यक्षपदी भगवंत पाटील, सचिवपदी नरेंद्र घोडके विजयी झाले. तसेच, खजिनदार, लायब्ररी चेअरमन व मॅनेजमेंट कमिटी सदस्य चार पदाधिकारी प्रत्येकी एक अर्ज आलेला होता. त्यामुळे या पदासाठी बिनविरोध निवड झाल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. विकास जाधव यांनी दिली. निवडणूक कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून घेण्यात आली. मुख्य निवडणूक निर्णयवेळी अधिकारी ॲड. विकास जाधव, ॲड. सुनील कुलकर्णी, ॲड. शंकर ननवरे, लायब्ररियन ॲड. अक्षय रानमाळ उपस्थित होते.
बार्शी बार असोसिएशनच्या सन २०२१-२२च्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी गणेश मधुकर काळे, पद्माकर बिभीषण काटमोरे, रत्नमाला के. पाटील, शिवाजी आर. जाधव, अविनाश हौसेराव जाधव, काकासाहेब दत्तू गुंड यांच्यात लढत झाली. ॲड. अविनाश जाधव १२ मताधिक्याने अध्यक्षपदासाठी विजयी झाले.
उपाध्यक्षपदासाठी अजय शिवाजी भुसारे, उषा नंदकुमार पवार, विशाल दिलीप गोणेकर, भगवंत शिवाजीराव पाटील
यांच्यामध्ये झालेल्या लढीत भगवंत पाटील यांनी ३४ मताधिक्य घेत उपाध्यक्षपदावर विराजमान झाले.
सचिवपदाच्या निवडणुकीमध्ये इकबाल दस्तगीर पठाण, नरेंद्र मधुकर घोडके यांची समोरासमोर लढत झाली. यामध्ये नरेंद्र घोडके यांनी ८६ मताधिक्य मिळवून विजयीश्री खेचून आणली.
खजिनदरपदासाठी अनंत अप्पराव मस्के, लायब्ररी चेअरमन अविनाश कोंडिबा गायकवाड, मॅनेजमेंट कमिटीसाठी उषा नंदकुमार पवार, संजय श्रीराम गुंड, धिरज हरी कांबळे, अक्षय नागनाथ बिडबाग यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. बार असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये २८१ मतदारांपैकी २६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
