आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बाणेरमध्ये स्पा सेंटरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 16, 2021
Spread the love

मालकासह मॅनेजर अटकेत : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : बाणेर येथील एका सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पुण्याच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी 4 महिलांची सुटका केली आहे. स्पा मालक व मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.

झेया स्पा मालक आणि मॅनेजर फजल अब्दुल मतीन अहमद (वय 24, रा. येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार मनिषा पुकाळे यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, बाणेर येथील एका सोसायटीत झेया स्पा नावाने मसाज सेंटर चालविले जाते. या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यावरुन बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी रात्री साडेआठ वाजता तेथे छापा टाकण्यात आला. त्यावेळी तेथे 4 महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेण्यात येत होता. या चारही पिडित महिलांना सुधारगृहात पाठविण्यात आले असून स्पा मालक व मॅनेजर यांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण अधिक तपास करीत आहेत.