आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पिसोळीतील राखीव वनक्षेत्र येथे कारवाईस अडथळा करणारा अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 17, 2021
Spread the love

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : पाळीव जनावरे सुरक्षित नेत असताना वाहन अडविले

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पिसोळी (ता. हवेली) येथील राखीव वनक्षेत्र येथे अतिक्रमण निष्कासन कारवाई करून पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी नेत असताना वाहने अडविल्याप्रकरणी एकाला अटक केली. बुधवारी (दि. १५ डिसेंबर २०२१) सकाळी कारवाईदरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

वेदांग वासुदेव कानडे (वय १९, रा. कसबा पेठ, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंढव्यातील वनरक्षक मनोज पारखे (वय २८, रा. बाणेर, पुणे) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी कोंढवा येथे वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी (दि. १५ डिसेंबर २०२१) सकाळी साडेदहाच्या सुमारास पिसोळी येथील राखीव वनक्षेत्र नं.३० कोंढवा येथे अतिक्रमण निष्कासन कारवाई सुरू होती.त्यावेळी पाणीव जनावरे शासकीय वाहनांमध्ये भरून सुरक्षित ठिकाणी नेत असताना आरोपीने गाड्यांच्या समोर उभे राहून चालकांस अटक निर्माण केला. त्यामुळे फिर्यादीने शासकीय कामात अडथळा आणू नका असे सांगितले, तरीसुद्धा त्यांनी ऐकले नाही, म्हणून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. कोंढवा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे पुढील तपास करीत आहेत.