आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करणारे पाच जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 18, 2021

हडपसर पोलिसांची कामगिरी : फुरसुंगीतील ढमाळवाडीमध्ये घडली होती घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पूर्व वैमनस्यातून एका टोळक्याने तरुणाला कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार फुरसुंगीमधील भेकराईनगर येथील ढमाळवाडीमध्ये मंगळवारी साडेआठ वाजता घडला. हडपसर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

कृष्णा ऊर्फ चिक्या सुभाष बाळुरगी (वय २०, रा. हांडेवाडी), रुपेश विनोद धोत्रे (वय २०, रा. गोसावी वस्ती), अतुल जाधव (वय २०, रा. माळवाडी, हडपसर), अथर्व शिंदे (वय २०, रा. माळवाडी, हडपसर) आणि राहुल राठोड (वय १९, रा. गोसावी वस्ती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कविता प्रभाकर रुक्के (वय ४०, रा. महाराष्ट्र कॉलनी, ढमाळवाडी, भेकराईनगर, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांचा मुलगा अजय रुक्के याचे आरोपींबरोबर यापूर्वी भांडण झाले होते. मंगळवारी अजय त्याच्या मित्रासोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी आरोपी मोटारसायकलवरुन तेथे आले. जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्यांनी अजय याला शिवीगाळ करुन मारा मारी, याला मारुन टाका असे बोलून कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. लोखंडी कोयते हवेत नाचवत बघा याला कसा तोडला आम्हाला नडला त्याला असेच तोडणार असे म्हणून लोकांमध्ये दहशत निर्माण केली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलिस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करीत आहेत.

get_footer();