आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भाईगिरी करणारा सराईत वर्षभरासाठी स्थानबद्ध

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 23, 2021
Spread the love

पोलीस आयुक्तांची कारवाई : कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : भाईगिरी करुन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला लोणीकंद पोलीसांमुळे एक वर्ष स्थानबद्ध केले गेले आहे. याबाबत आदेश पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काढला आहे.

आकाश माने (वय, 22, रा केसनंद, ता हवेली ) असं या गुन्हेगाराचे नाव आहे.

माने याने भाईगिरी करून दहशद निर्माण केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होत होता. या पार्श्वभुमीवर लोणीकंद पोलीसांनी त्याच्या गुन्ह्यांची यादी काढून स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिला होता. यानूसार आकाश माने याला औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानूसार परिमंडळ 4 चे उपायुक्त रोहिदास पवार, सहायक आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश तटकरे, सहायक पोलिस निरीक्षक निखिल पवार, उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे, उपनिरीक्षक सुरज गोरे, बाळासाहेब सकाटे, प्रशांत कापूरे, सागर कडू, कैलास साळूंके, प्रशांत करनावर, विनायक साळवे, अजित फरांदे यांनी केली आहे.