आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भरधाव ट्रकच्या धडकेत १३ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 29, 2021

ट्रकचालकाला अटक : शिवाजीनगर येथील प्रीमिअर गॅरेज जवळ घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : भरधाव ट्रकची मोटारसायकलला धडक बसून झालेल्या अपघातात १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर १२ वर्षींय गौरी गंभीर जखमी झाली. शिवाजीनगर येथील प्रीमीयर गॅरेज चौकापुढे ही घटना २६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी ट्रकचालकास अटक केली आहे.

गायत्री रेमजे (वय १३, रा. कसबा पेठ, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

आब्बासअली खाजामिया सैय्यद (वय ३५, रा. हुडगी, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी श्रीकांत रेमजे (रा. कसबा पेठ, पुणे) यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांची पुतणी कु. गायत्री (वय १३) व गौरी (वय ८) यांना घेऊन मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी भरधाव ट्रकची मोटारसायकलला ठोकर बसून अपघात झाला. या अपघातात गौरी गंभीर जखमी झाली, तर गायत्रीचा मृत्यू झाला. शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नाईकवडे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();