आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वकिलाने केला महिलेचा विनयभंग

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 30, 2021
Spread the love

डेक्कन पोलिसांत गुन्हा : एरंडवणे येथील सोसायटीत घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पतीबरोबरच्या वादाबाबत व घटस्फोट घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी आलेल्या पक्षकार महिलेचा 62 वर्षाच्या वकिलाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार राजेंद्र शहा याच्या एरंडवणे येथील आनंदोमय सोसायटीतील कार्यालयात 27 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला होता.

याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी राजेंद्र गोविंददास शहा (वय 62, रा. लक्ष्मीनारायण नगर, मेहंदळे गॅरेजजवळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका 29 वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिला या पतीसोबत होणार्‍या वादाबाबत व घटस्फोट घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी अ‍ॅड. शहा यांच्या कार्यालयात आल्या होत्या. त्यावेळी कार्यालयात इतर कोणी नव्हते. चर्चा करुन त्या कार्यालयाच्या बाहेर जात असताना अ‍ॅड. शहा याने फिर्यादीच्या पाठीमागून येऊन त्यांच्या पाठीवरुन हात फिरवून त्यांच्या डाव्या दंडाला पकडले व हाताचा इशारा करुन आत चल असे बोलून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या महिलेच्या फिर्यादीनुसार डेक्कन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक कवठीकर तपास करीत आहेत.