आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

महिला वकिलावर पोलीस शिपायाकडून अत्याचार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 4, 2022
Spread the love

चतु:श्रृंगी ठाण्यात बलात्काराचा गुन्हा : लग्नास नकार देऊन केली फसवणूक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मेट्रोमोनि साईटवर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका पोलीस काँस्टेबलने महिला वकीलाशी शरीर संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

लक्ष्मण गंगाधर राऊत (वय 33, रा. पत्रा चाळ, पाषाण. मुळ रा. लोणी काळभोर) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. तो सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या एटीएस सेलमध्ये कार्यरत आहे. याप्रकरणी एका 29 वर्षाच्या महिला वकिलाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस शिपायावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि लक्ष्मण राऊत यांची मार्च 2020 मध्ये मेट्रोमोनी या विवाहाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झाली. राऊत याने फिर्यादी यांचा मोबाईल नंबर घेऊन त्यांच्याशी ओळख वाढविली. त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना देहुरोड, पिंपळे निलख येथील लॉजवर नेऊन त्यांच्याशी शरीर संबंध ठेवले. लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.