आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बहिणीने पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी मिळताच घेतले १.४० कोटींचे कर्ज

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 9, 2022
Spread the love

चतुश्रुंगी पोलिसांत फिर्याद : रेलिगेर फिनवेस्ट लि. विरूध्द गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : तेलंगणातील महिलेने पुण्यात फ्लॅट घेतला त्या ठिकाणी भाडेकरु ठेवण्यासाठी तिने पुण्यात राहणाऱ्या आपल्या बहिणीला पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी करुन फ्लॅट भाड्याने देण्याचा अधिकार दिला. तिने त्याचा वापर करुन या फ्लॅटवर तब्बल १ कोटी ४० लाख रुपयांचे कर्ज घेऊन आपल्याच बहिणीची फसवणूक केली आहे.

याप्रकरणी जुली गिरीश अय्यर (वय ४४, रा. हैद्राबाद) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ज्योती राजीव नायर (वय ४७) राजीव नायर (दोघे रा. पुष्पक पार्क, औंध) आणि रेलिगेर फिनवेस्ट लि. या अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थेवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अय्यर यांनी औंध येथील वात्सल विहार अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट घेतला. तो भाड्याने देण्यासाठी त्यांनी त्यांची बहिण ज्योती नायर यांच्या नावे जनरल पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी करुन दिले. त्या योगे त्यांना तो फ्लॅट भाड्याने देण्याचे अधिकार देण्यात आले होते. २०१३ मध्ये पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी करण्यात आली होती. हा फ्लॅट विकण्याचा अथवा तारण ठेवण्याचा अधिकार दिला नसताना त्यांनी फिर्यादी यांच्या संमतीशिवाय फिर्यादी यांची बनावट सही करुन व कागदपत्रांचा वापर करुन रेलिगेर फिनवेस्ट या अर्थ पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून या फ्लॅटवर १ कोटी ४० लाख रुपयांचे कर्ज घेऊन फिर्यादी यांचे आर्थिक नुकसान केले आहे. पोलीस उपनिरीक्षक भालेराव तपास करीत आहेत.

get_footer();