आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 10, 2022
Spread the love

चंदननगर पोलिसांची कामगिरी : २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्याच्या चंदननगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व नऊशे रुपये किंमतीचे तीन काडतुसे जप्त केली.

चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हवालदार तुषार भिवरकर यांनी तक्रार दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरी प्रतिबंधात्मक पेट्रोलींग करीत असताना गावठी पिस्तुलधारक दर्गा रोड येथील धाब्यावर येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयावरून आरोपीला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व नऊशे रुपये किंमतीचे तीन काडतुसे जप्त केली.

चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, पोलीस हवलदार तुषार भिवरकर, पोलीस नाईक सचिन कुटे, पोलीस नाईक श्रीकांत शेंडे, पोलीस नाईक महेश नाणेकर, पोलीस अंमलदार नामदेव गडदरे, अमित कांबळे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.

get_footer();